Homeताज्या बातम्या

श्रीगोंदा येथे कुकडी कॅनॉलवरील अनधिकृत पाईपलाईन हटवा

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील वाढती पाणीचोरी, अनधिकृत पाईपलाईन आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना अपुरा होणारा पाणीपुरवठा या गंभीर प्रश्नांकडे लक्

पर्यटन केंद्राच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार; मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची वन विभागाला कारवाईचे आदेश
पर्यावरण कार्यकर्त्या जयमाला ढाणकीकर यांच्या पाठपुराव्याला यश; गोदावरी प्रदूषणप्रकरणी नांदेड महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाचा मोठा दणका
प्रा. धनंजय हांडे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहात
श्रीगोंदा : कुकडी, घोड कालव्याच्या पाण्याकडे डोळे; शेतीसाठी तातडीने पाणी  सोडा

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील वाढती पाणीचोरी, अनधिकृत पाईपलाईन आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना अपुरा होणारा पाणीपुरवठा या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत सावतामाळी पाणी वापर सहकारी संस्थेसह १३२ क्रमांकावरील विविध पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले. कुकडी कॅनॉल क्रमांक १३२ वरील सर्व अनधिकृत पाईपलाइन तातडीने काढून टाकाव्यात तसेच बंदिस्त पाईपलाइनद्वारे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचविण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.

श्रीगोंदा येथे झालेल्या कुकडी-घोड लाभक्षेत्र आढावा बैठकीदरम्यान पाणी वापर संस्थांच्या अध्यक्ष व प्रतिनिधींनी हे निवेदन पालकमंत्र्यांकडे सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, कुकडी कॅनॉल क्रमांक १३२ वर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पाईपलाइन टाकण्यात आल्यामुळे शेवटच्या टोकावरील पाणी वापर संस्थांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. त्यामुळे संबंधित कालव्यावरील सर्व अनधिकृत पाईपलाइन हटविण्याचे आदेश द्यावेत. तसेच विसापूर शाखा कालव्यावर (कि.मी. १३२) सुमारे २५० क्युसेक क्षमतेची व्यवस्था करून टेल भागातील संस्थांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, कुकडीच्या पाणी वितरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी, पाण्याची गळती आणि बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी बंदिस्त (पाईपलाइन) पाणीपुरवठा योजना राबविण्याची आवश्यकता निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. डी.वाय. १२ नुसार बंदिस्त पाईपलाइनद्वारे पाणीपुरवठा केल्यास पाणीचोरीला आळा बसेल, गळती कमी होईल आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत नियमित व पुरेशा दाबाने पाणी पोहोचेल, असा दावा करण्यात आला आहे.

या निवेदनावर सावतामाळी पाणी वापर सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळू बाजीराव खेतमाळीस,शिवाजी शंकर राऊत यांच्यासह मायनर १३२ क्रमांकावरील विविध पाणी वापर संस्थांच्या अध्यक्ष व प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS