देवळाली प्रवरा : नॅशनल वैदिक विस्टा-२०२६ अंतर्गत ओम चॅरिटेबल ट्रस्ट, चेन्नई (तामिळनाडू) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शुक्ल यजुर्वेद संहित

देवळाली प्रवरा : नॅशनल वैदिक विस्टा-२०२६ अंतर्गत ओम चॅरिटेबल ट्रस्ट, चेन्नई (तामिळनाडू) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शुक्ल यजुर्वेद संहिता परीक्षेत देवळाली येथील आदित्य गणेश कुलकर्णी याने ९० टक्के गुण मिळवत प्रथम श्रेणी संपादन केली आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेला देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात आदित्यने मिळवलेले हे यश देवळालीसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या यशामागे नृसिंहवाडी (कोल्हापूर) येथील स्वामी स्वरूपानंद वेद विद्यालयाचे वेदमूर्ती गोविंद जोशी आणि वेदमूर्ती अथर्व जोशी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.
आदित्यच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ओम चॅरिटेबल ट्रस्ट, चेन्नईचे पदाधिकारी, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक आणि वैदिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS