Homeताज्या बातम्या

टीईटी पेपरफुटीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोलसीबीआय चौकशीची विरोधकांची मागणी ; पत्रकारांच्या सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्‍नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधी पक्षांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छ

भोंदू अशोक खरातचा ताबा ईडीकडे
अशोक खरातचा बनावट खात्यातून 52 कोटींचा घोटाळापरदेशात पलायनाच्या तयारीचा असल्याचा तपासातून उलगडा
भोंदूबाबाला 10 वर्षांची सक्त मजुरी


मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्‍नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधी पक्षांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले. या प्रकरणासाठी राज्य सरकारला जबाबदार धरत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
प्रश्‍नपत्रिका फुटली एका ठिकाणी आणि पैसा पोहोचला दुसरीकडे तसेच शिक्षकांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्‍या सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. लाखो विद्यार्थ्यांच्या आणि उमेदवारांच्या भविष्याशी खेळ करणार्‍या या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. तसेच संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय तपास संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. विधानसभेतील प्रश्‍नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणाबरोबरच सावकारी आणि आर्थिक फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. दिवाकर निकुरे या कथित सावकाराविरुद्ध अद्याप अटक कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात धनादेश देण्यात आले, मात्र ते वटले नाहीत. एवढ्या गंभीर आरोपांनंतरही संबंधित व्यक्तीविरोधात ठोस कारवाई का होत नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. अधिवेशनादरम्यान पत्रकारांना कथित धमक्या देण्यात आल्याच्या प्रकरणावरूनही विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणण्याचे प्रकार गंभीर असून, पत्रकारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. आमदार विलास भुमरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा प्रत्यक्ष केंद्रांवर पारंपरिक पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी सभागृहात केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता कमी होईल आणि परीक्षेच्या प्रक्रियेवरील विश्‍वास वाढेल, असे त्यांनी सांगितले.
प्रश्‍नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी उघड करावी : वडेट्टीवार
काँगे्रस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिक्षक पात्रता परीक्षा आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांमधील प्रश्‍नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे राज्याची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत व्यक्त केली. मेहनत घेणार्‍या लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फेरणार्‍या या घटनांमागील संपूर्ण साखळी उघड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या घोटाळ्यांतील आरोपी, संबंधित संस्था आणि विविध राज्यांतील कथित संबंधांची सखोल चौकशी करून संपूर्ण जाळ्याचा पर्दाफाश करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. सरकारच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित करत, या प्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS