Homeताज्या बातम्या

‘वंचित’च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी ऍड.डॉ.अरुण जाधव यांची निवड

जामखेड : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी जामखेडचे भूमिपुत्र तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड. डॉ. अरुण जाधव यांची निव

गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा
स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी पॉलिटेक्निकमध्ये वृक्षारोपण
वरिष्ठ अधिकार्‍यांच्या धाडींनंतरही नरसीत देहव्यापार सुरूच; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जामखेड : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी जामखेडचे भूमिपुत्र तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड. डॉ. अरुण जाधव यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत त्यांना राज्यभरातून क्रमांक दोनची सर्वाधिक मते मिळाली असून आगामी काळात त्यांच्याकडे पक्षाची आणखी महत्त्वाची राज्यस्तरीय जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या तीस वर्षांपासून राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ऍड. डॉ. अरूण जाधव यांनी भटके-विमुक्त, दलित, आदिवासी, ओबीसी, कष्टकरी व वंचित समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडत संघटनात्मक बांधणीसाठी राज्यभर काम केले आहे. ‘मुशाफिरी यात्रा’सह विविध जनजागृती मोहिमांमधून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

त्यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने निवडणूक पध्दतीने निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत मोठ्या मताधिक्य मिळवून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवडून आले.ऍड.डाॅ.अरुण जाधव विजयी होताच राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले. जामखेड तालुक्यासह आहिल्यानगर जिल्ह्यातही आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS