Homeताज्या बातम्या

मनमाड महामार्गावर एका भीषण अपघाताने तरुणाचा बळी 

मनमाड महामार्गावर एका भीषण अपघाताने तरुणाचा बळी घेतला आहे. राहुरी तालुक्यातील डिग्रस फाट्याजवळ अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की तरुणाला वाहनासह सुमारे ५०० फूट फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे.राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. डिग्रस येथील आमोल पाराजी गावडे (वय २९) हे कोल्हार येथील आयडीबीआय बँकेत काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते.डिग्रस फाट्यावर रस्ता ओलांडत असताना नगरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आमोल गावडे यांना दुचाकीसह सुमारे ५०० फूट फरफटत नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सागर नवले आणि अंबादास गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली.मयत आमोल गावडे यांच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असून, त्यांच्या निधनामुळे डिग्रस गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत पुढील तपास करत आहेत.

शेततळ्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
गोदावरी नदीत बुडून तिघींचा मृत्यू
तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती मृत्यू

COMMENTS