Homeताज्या बातम्या

 वांजोळी येथे सघन कापूस लागवड मार्गदर्शन

माका : कृषी दिनानिमित्त वांजोळी (ता. नेवासा) येथे शेतकरी बांधावर आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर सुधाक

चिंचाळा येथे कृषी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणसेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत – प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळकृषी महाविद्यालयाने चिंचाळा गावात विविध कृषीविषयक उपक्रम राबवावेत – सरपंच पंडित कल्याण पोकळे
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरणशेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन
‘साईकृपा’च्या कृषिकन्यांचे लिंपणगावात स्वागत

माका : कृषी दिनानिमित्त वांजोळी (ता. नेवासा) येथे शेतकरी बांधावर आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर सुधाकर बोराळे यांनी शेतकऱ्यांना सघन कापूस लागवड तंत्रज्ञान, संत्रा बाग व्यवस्थापन तसेच फळबाग विमा योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी केंद्र पुरस्कृत उत्पादकता अभियान (कापूस कांती) २०२६-२७ अंतर्गत सघन कापूस लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी योग्य लागवड अंतर, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी बचत, तण नियंत्रण तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे महत्त्व श्री. बोराळे यांनी अधोरेखित केले. उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे समाधान करून सघन लागवड पद्धतीचे आर्थिक व तांत्रिक फायदेही त्यांनी स्पष्ट केले.त्यानंतर संत्रा बागेची प्रत्यक्ष पाहणी करून बहार व्यवस्थापन, पोषण व कीड-रोग नियंत्रण, हवामानातील बदलांचा फळबागांवर होणारा परिणाम तसेच ‘एल निनो’ परिस्थितीत घ्यावयाच्या आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी फळबाग विमा योजनेची सविस्तर माहिती देत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट व इतर संकटांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी फळबाग विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, मंडळ कृषी अधिकारी बबनराव कराड, सहायक कृषी अधिकारी  गणेश भराट, सहायक कृषी अधिकारी  रुपेश पवार, सिद्धेश्वर शेतकरी गटाचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS