Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चापडगावमध्ये धनगर आरक्षण आंदोलन पेटले

अहमदनगर-सोलापूर महामार्गावर सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

जामखेड/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून चौंडी येथे धनगर आरक्षण मिळण्यासाठी काही तरूणांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. अनेक दिवसांपासून उपो

जवखेडे तिहेरी हत्याकांड प्रकरणातील तिन्ही आरोपी निर्दोष
राष्ट्रीय परिषदेतून तंत्रज्ञानाच्या माहितीचा विस्तार ः डॉ. गुल्हाने
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ

जामखेड/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून चौंडी येथे धनगर आरक्षण मिळण्यासाठी काही तरूणांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. अनेक दिवसांपासून उपोषण सुरू असतांना देखील या उपोषणाकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ अहमदनगर सोलापूर महामार्गावरील चापडगावमध्ये धनगर समाजाच्या तरूणांनी सरकारचा निषेध व्यक्त केला.
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत यशवंत सेनेच्या वतीने उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे उपोषणास बसले आहेत. या उपोषणाचा दहा दिवस झाले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तरी सरकारच्या एकाही प्रतिनिधीने आद्याप दखल घेतली नाही. धनगर समाज राज्यात आक्रमक होतांना दिसत आहे. यावेळी राज्यात अनेक ठिकाणी सरकारचा पुतळे जाळले जात आहेत चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहेत. सरकारने वेळीच दखल न घेणल्यास महाराष्ट्रात आंदोलनाचा वनवा उग्र रूप धारण करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. शुक्रवारी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी चौडी येथे जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व केंद्रीय मंत्री रामदास आठवले व पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. तसेच भारत राष्ट्रीय समिती पक्षाच्या समन्वयक मयूरी बाळासाहेब म्हस्के (गेवराई जि बीड) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह चौडी येथे उपोषणस्थळी भेट देऊन धनगर आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

आमदार प्रा. राम शिंदे घेणार पुढाकार- आमदार प्रा. राम शिंदे यांनी आपले दौरे रद्द करून औरंगाबाद गाठले आहे. तेथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. आमरण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे त्यांच्या मागण्यांची दखल घेण्याबाबत मूख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना तातडीचे पत्र देवून, त्यांचे लक्ष या उपोषणाकडे आमदार शिंदे वेधणार आहेत.

पालकमंत्री विखेंचा केला निषेध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा चौंडी येथे उपोषणकर्त्यांच्या भेटीचा नियोजित दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे संतापलेल्या धनगर समाजाच्या तरूणांनी अहमदनगर-सोलापूर महामार्गावरील चापडगाव येथे सरकारचा पुतळा जाळून सरकार व पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत आपला रोष व्यक्त केला.

COMMENTS