Homeताज्या बातम्या

पाथर्डी मनसेच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; ‘गाव तिथे शाखा’ उपक्रम राबवणार

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मनसे पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये व संपर्क अध्यक्ष नयन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विक्रमी कार्यकाळानिमित्त मढीत आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते महाआरती
कांदा लिलावासाठी घालून घरी परतत असलेल्या शेतकर्‍याच्या दुचाकीची समोरासमोर धडक;एक ठार,एक गंभीर जखमी!
पाथर्डी पोलिसांचा अवैध दारू व्यवसायावर छापा; गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून आरोपीला अटक

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मनसे पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये व संपर्क अध्यक्ष नयन कदम यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या असून मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली.

नवनियुक्त पदाधिकारी:

  • उपजिल्हाध्यक्ष : देविदास हंडाळ (मोहरी)
  • उपतालुकाध्यक्ष : रामेश्वर काकडे (सोमठाणे), विनोद गव्हाणे (आल्हणवाडी), एकनाथ सानप (शिरसाटवाडी)

तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटन बळकट करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ताकदीने तयारीला लागण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी दिल्या. तालुक्यात सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून मनसे हा जनतेसमोर सक्षम पर्याय म्हणून उभा राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. पक्ष बांधणीसाठी लवकरच तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस शेतकरी सेनेचे अंबादास शेळके, महिला सेनेच्या रेणुका फुलशेटे, शहराध्यक्ष संदीप काकडे, विद्यार्थी सेनेचे प्रवीण शिरसाट यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS