Homeताज्या बातम्या

संजीवनी शैक्षणिक संकुलात वटपौर्णिमा उत्साहात

कोपरगाव  : सोमवारी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, संजीवनी युनिव्हर्सिटी आणि संजीवनी महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमा उ

ऐतिहासिक रस्ता, चौक, वास्तूस भूषण देशमुखांचे नाव द्यावे : गुगळे  
सात्रळ येथे प्रवरेच्या कृषिकन्यांचे आगमन
‘शिंदे’ महाविद्यालयात संत कबीर जयंती उत्साहात  

कोपरगाव  : सोमवारी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, संजीवनी युनिव्हर्सिटी आणि संजीवनी महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी वटवृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.  तसेच भारतीय सण-उत्सव आणि संस्कृती जपण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यक्रमामध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांतील महिला प्राध्यापक यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वटवृक्षाचे विधिवत पूजन केले. हातात पूजासाहित्य, कपाळावर कुंकू आणि पारंपरिक साड्यांनी नटलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालत कुटुंबाच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच अखंड सौभाग्य लाभावे, अशी प्रार्थना केली. यावेळी युवतींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.याप्रसंगी बोलताना डॉ. मनाली कोल्हे यांनी शिक्षणासोबतच संस्कृती व सांस्कृतिक मूल्ये, विविधता आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश दिला. त्या म्हणाल्या की,  “आधुनिकतेचा स्वीकार करत असतानाच संस्कृतीशी असलेली आपली नाळ जोडून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वटसावित्रीसारखा सण कुटुंबवत्सलता, निष्ठा, समर्पण, परस्पर आदर याची शिकवण देणारा सण आहे.कार्यक्रमास  राजश्री ठाकूर, डॉ. सरिता पवार, डॉ. कविता राणी, डॉ. आर. प्रिया, डॉ. देवयानी भामरे यांच्यासह संजीवनीमध्ये कार्यरत विविध महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS