Homeताज्या बातम्या

गोदावरी नदीत बुडून तिघींचा मृत्यू

परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मोहळा येथे रविवार (14 जून) रोजी सका

दुर्दैवी! दोन शिक्षिकेंचा एकाचवेळी अपघाती मृत्यू | LOKNews24
कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यूफरशी धुण्याचे काम सुरू असताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ
मनमाड महामार्गावर एका भीषण अपघाताने तरुणाचा बळी 


परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मोहळा येथे रविवार (14 जून) रोजी सकाळी गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, या दोघींना डोळ्यांदेखत बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी घेतलेली त्यांची चुलत बहीणही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. एकाच कुटुंबातील तिघींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

COMMENTS