Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती मृत्यू

बीड : केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई मार्गावरील रेणापूर फाट्य

धमक्या, खोट्या तक्रारींनाही न जुमानता ‘लेडी सिंघम’ शितल सय्यद यांची धडाकेबाज मोहीम; बदलीच्या चर्चेने केजकर आक्रमक
भांडण सोडवायला गेलेल्या निष्पाप तरुणाचा खूनकेज तालुक्यात संतापाची लाट, आरोपींच्या अटकेसाठी रस्ता रोको
पोलिस पाटील संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी कृष्णा कदम यांची निवडसर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

बीड : केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई मार्गावरील रेणापूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. कर्तव्यनिष्ठ आणि तरुण अधिकार्‍याचा असा अकाली अंत झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गिड्डे हे स्वतःच्या वाहनाने प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटले. वेगात असलेले वाहन रस्त्याच्या कडेला घसरून उलटले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेणापूर पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातावेळी ते वाहनात एकटेच होते. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी मदतकार्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे प्रशासनात तसेच स्थानिक स्तरावर हळहळ व्यक्त होत आहे. मेहनती, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख असलेल्या गिड्डे यांच्या निधनाने महसूल यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये शोकभावना व्यक्त केली जात आहे.

COMMENTS