Homeताज्या बातम्या

प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; पारनेरमध्ये टंचाई आढावा बैठक

पारनेर : अधिकारी निष्क्रीय होतात तेव्हा लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो. प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करण्याचे निर्देश जलसंपद

खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी; नाशिक मनपात शिंदे अन् ठाकरे गट आमनेसामने, जोरदार हायव्होल्टेज ड्रामा!
नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याने काँग्रेसची टीका
सौ. के.एस.के. महाविद्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

पारनेर : अधिकारी निष्क्रीय होतात तेव्हा लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो. प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पारनेर तालुक्यात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आ. काशिनाथ दाते, भाजपाचे अध्यक्ष राहूल शिंदे, सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत यांच्यासह सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

तालुक्यातील पाणी, वीज, रस्ते व औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात बैठकीमध्ये नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची दखल घेऊन मंत्री विखे पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. औद्योगिक वसाहतीमधून तलावात सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल पाठविण्यास सांगितले.

जामगाव येथे टँकरची मागणी असतानाही निर्णय होत नसल्याबद्दल गटविकास अधिकारी सोनकुसळे यांना कडक शब्दात ताकीत देऊन तातडीने टँकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

शहरातील रस्त्यांचे काम दुभाजक टाकूनच पूर्ण करावेत असे स्पष्ट निर्देश देताना, पावसाच्या कारणाने रस्त्यामध्ये पडलेले खड्डे तातडीने बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करण्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांना जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. यापैकी तीन योजनांना मुळा धरणातून पाणी उपलब्ध होत आहे. अन्य तीन योजनांसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत लवकरच निर्णय होईल. त्यामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून, चाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १०१ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

यापूर्वी तालुक्यात फक्त खंडणीराज होते. योजना फक्त कागदावर होत्या, फक्त बिल काढण्याचे काम झाले. पण आता तालुक्याची परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे. गुंडगिरी हद्दपार होऊन विकासाची कामे होत आहेत. आ. दाते यांच्या माध्यमातून अजून खूप काम होणार असल्याने निधी कमी पडणार नाही, असे सांगत नागरिकांनी ठेवलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

आ. काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात अधिकाऱ्यांनी काम करण्याबाबत गांभीर्य दाखवावे, कामासाठी लोकांना चकरा मारायला लावू नका, असे सांगत वीज भारनियमनाच्या संदर्भात समस्या सोडविण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली.

COMMENTS