Homeताज्या बातम्या

सौ. के.एस.के. महाविद्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

बीड — येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने क्

खा. नागेश पाटील यांचा ताफा अडवल्याप्रकरणी बबनराव बारसे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी समाजाने पुढे यावे; सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांचे आवाहन
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; ज्येष्ठ विधीज्ञांचा विशेष सत्कार

बीड — येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. वंदना फटाले यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा आलेख मांडला. क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन इंग्रजांच्या विरोधात रान पेटवण्याचे काम केले. त्यांनी प्रति सरकार स्थापन करून इंग्रजी सत्तेला विरोध केला. ते शेवटपर्यंत भूमिगत राहून स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बीड जिल्ह्याचे खासदार होण्याचा बहुमानही त्यांच्या नावे आहे.

या कार्यक्रमावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस., राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. जयंत साठे, डॉ. प्रमोद गायके, डॉ. लालासाहेब घुमरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS