Homeताज्या बातम्या

किनवट-माहूरच्या वीज समस्यांवर आमदार भीमराव केराम आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती, १०० गावांत नवीन खांब बसवण्याचे कडक निर्देश

किनवट : किनवट आणि माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून उद्भवणाऱ्या गंभीर वीज समस्यांची दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी महावित

प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!
आ.केराम यांची शिक्षण आयुक्तांकडे आक्रमक मागणीनांदेडमधील पेसा शिक्षक भरतीची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी
बळीराजाची ऐतिहासिक घोडदौड: अन्याय-शोषणमुक्त स्वप्नाची नवी पहाट; दिल्लीतील महासुनावणीत शेतकरी आणि आदिवासींचा विजय

किनवट : किनवट आणि माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून उद्भवणाऱ्या गंभीर वीज समस्यांची दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. ग्रामीण नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांची होणारी अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दांत आमदार केराम यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

या बैठकीत आमदार केराम यांनी वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अवेळी होणारे लोडशेडिंग आणि जुन्या-कमजोर विद्युत खांबांमुळे निर्माण होणारा धोका याकडे त्यांनी लक्ष वेधले. किनवट व माहूर तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमध्ये अतिरिक्त विद्युत खांबांची तीव्र गरज असून, ही कामे सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वेळेवर व पुरेशा दाबाने वीज मिळावी, यासाठी डीपी (DP) क्षमतेत सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता गाडेकर, बोरगावकर, उपकार्यकारी अभियंता केंद्र यांच्यासह किनवट व बोधडी विभागातील सर्व सहायक व कनिष्ठ अभियंत्यांची उपस्थिती होती. आक्रमक बैठकीनंतर आता महावितरण प्रशासन खडबडून जागे झाले असून, रखडलेल्या वीज कामांना गती मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS