Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हद्दपार आरोपी वाळू चोरी करताना जेरबंद; राहुरी पोलिसांची कारवाई; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

देवळाली प्रवरा : जिल्हा हद्दपार असलेला आरोपी अवैध वाळू वाहतूक करताना राहुरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. निखिल बबन लाटे असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून, तो विना क्रमांक प्लेटच्या हायवा डंपरद्वारे वाळूची चोरी करून वाहतूक करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पथकाला संशयास्पद हालचाल आढळली. तपासणी केली असता निखिल लाटे हा डंपरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना रंगेहात सापडला. संबंधित आरोपी यापूर्वीच जिल्हा हद्दपार करण्यात आलेला असल्याची बाबही यावेळी समोर आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये हायवा डंपर व वाळूचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ तसेच बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, सतीश आवारे आदींच्या पथकाने केली. दरम्यान, या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास राहुरी पोलिसांकडून सुरू आहे. वाळू तस्करांची वाढती मुजोरीच यातून अधोरेखित होते. परंतु आता पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने या घटनांना भविष्यात चाप बसेल असे म्हटले जात आहे.

शेवगाव पोलिसांचा मोठा दणका! सालवडगाव शिवारात अवैध ‘मावा’ कारखान्यावर छापा; ३१ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना ठोकल्या बेड्या!
अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मोठा अनर्थ! अहिल्यानगरमध्ये प्रात्यक्षिकादरम्यान हँड ग्रेनेड फुटल्याने प्रचंड खळबळ
अहिल्यानगरमध्ये काळाचा घाला! तपोवन रोडवर भरधाव डंपरने वयोवृद्ध महिलेला चिरडले; अपघातात जागीच मृत्यू

देवळाली प्रवरा : जिल्हा हद्दपार असलेला आरोपी अवैध वाळू वाहतूक करताना राहुरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. निखिल बबन लाटे असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून, तो विना क्रमांक प्लेटच्या हायवा डंपरद्वारे वाळूची चोरी करून वाहतूक करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पथकाला संशयास्पद हालचाल आढळली. तपासणी केली असता निखिल लाटे हा डंपरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना रंगेहात सापडला. संबंधित आरोपी यापूर्वीच जिल्हा हद्दपार करण्यात आलेला असल्याची बाबही यावेळी समोर आली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये हायवा डंपर व वाळूचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ तसेच बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, सतीश आवारे आदींच्या पथकाने केली.

दरम्यान, या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास राहुरी पोलिसांकडून सुरू आहे. वाळू तस्करांची वाढती मुजोरीच यातून अधोरेखित होते. परंतु आता पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने या घटनांना भविष्यात चाप बसेल असे म्हटले जात आहे.

COMMENTS