Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अमृतसरमध्ये लष्करी तळांजवळ दोन भीषण स्फोट; ‘देशात असे स्फोट होतच राहतात’, फारुख अब्दुल्लांच्या विधानाने संतापाचा भडका!

अमृतसर : पंजाबमध्ये एकामागून एक झालेल्या दोन स्फोटांनी संपूर्ण देश हादरला आहे. जालंधरमधील BSF मुख्यालय आणि अमृतसरच्या लष्करी छावणीजवळ हे स्

पंजाबमध्ये आप सरकार कोसळणार? पक्षातील 28 आमदार पक्ष सोडणार : नवीन जयहिंद
पंजाबमध्ये स्फोटांची मालिका; जालंधरनंतर अमृतसर हादरले
अठरा हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टीट्रम्प सरकारचा निर्णय ; 2025 सालीही झाली होती कारवाई

अमृतसर : पंजाबमध्ये एकामागून एक झालेल्या दोन स्फोटांनी संपूर्ण देश हादरला आहे. जालंधरमधील BSF मुख्यालय आणि अमृतसरच्या लष्करी छावणीजवळ हे स्फोट झाले. या भीषण घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असतानाच, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मंगळवारी ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास पंजाबमध्ये दोन ठिकाणी धमाके झाले. पहिला स्फोट जालंधरच्या BSF फ्रंटियर मुख्यालयाबाहेर उभी असलेल्या एका डिलिव्हरी स्कुटीमध्ये झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती पॉलिथिन बॅग तिथे सोडून पळताना दिसत आहे. या स्फोटाचा आवाज तब्बल एक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला, ज्यामुळे इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत.
जालंधरच्या घटनेनंतर काही वेळातच अमृतसरमधील लष्करी छावणीजवळ दुसरा स्फोट झाला. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठे आव्हान मानले जात आहे. सध्या एनआयए (NIA) आणि फॉरेन्सिक टीम या दोन्ही प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.
एकीकडे देश या घटनेने चिंतेत असताना, फारुख अब्दुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत असंवेदनशील वक्तव्य केले. “हिंदुस्थानात असे स्फोट होतच राहतात, त्यात नवीन काय?” असे विधान त्यांनी केले. अब्दुल्लांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेनंतर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधकांनी आम आदमी पार्टी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, सरकार आमदारांच्या परेडमध्ये व्यस्त असताना सामान्य जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
दहशतवादाचा धोका पुन्हा एकदा पंजाबच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून, या स्फोटांमागील मास्टरमाईंड कोण आहे, याचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत.

COMMENTS