Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

हदगाव तालुक्यातील 8 गावांचा अर्धापूर न्यायालयात समावेशप्रलंबित खटल्यांसह सर्व दिवाणी प्रकरणे वर्ग

हदगाव तालुक्यातील 8 गावांच्या दिवाणी प्रकरणांबाबत राज्य शासन आणि जिल्हा न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महाराष्

बीडच्या शिक्षणाधिकार्याकडून उच्च न्यायालयाचा अवमानशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिकास उच्च न्यायालयाची नोटीस
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड
दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी



हदगाव तालुक्यातील 8 गावांच्या दिवाणी प्रकरणांबाबत राज्य शासन आणि जिल्हा न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिवाणी संहिता अधिनियमाच्या कलम 22 ए नुसार या गावांना आता हदगाव न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रातून वगळून अर्धापूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. हा आदेश 1 मे 2026 पासून लागू झाला असून यामुळे स्थानिक पक्षकार आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चभारा, चोरंबा (ना.), निमगाव, खैरगाव, सोनाळा, चाभरा तांडा, रोडगी, निळकंठवाडी या आठ गावातील चालू व नवीन खटले अर्धापूर न्यायालयात चालणार. नांदेडचे प्रधान जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे आणि रजिस्ट्रार यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार या गावांचे सध्या हदगाव न्यायालयात प्रलंबित असलेले सर्व मूळ दिवाणी दावे आणि चालू कामकाज अधिकृतपणे मागे घेऊन ते अर्धापूर न्यायालयात वर्ग करण्यात येत आहेत. तसेच 18 मे पासून उद्भवणारे सर्व नवीन दिवाणी दावे देखील अर्धापूर न्यायालयातच नोंदवून व दाखल करून घेतले जातील. अशी माहीती अधिवक्ता संघाचे तालुकाध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी दिली. यावेळी विठ्ठल काकडे,जठन मुळे, संतोष पवार,परमेश्वर लालमे, आदींची उपस्थिती होती.
पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचणार…
भौगोलिक अंतर आणि प्रवासाचा त्रास विचारात घेता या 8 गावांचा अर्धापूर तालुक्याशी व न्यायालयाशी संपर्क येणे अधिक सोयीचे ठरणार आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आता हदगावला जाण्याची गरज नसल्याने पक्षकार नागरिक आणि वकिलांची मोठी सोय झाली असून परिसरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. हा आदेश जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर व सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

COMMENTS