Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पंजाबमध्ये आप सरकार कोसळणार? पक्षातील 28 आमदार पक्ष सोडणार : नवीन जयहिंद

अमृतसर : पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षासमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकल्याची चर्चा रंगली आहे. तब्बल 28 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा

श्री गुरु ग्रंथ साहिबांच्या विटंबनेविरुद्ध कडक कायदा मंजूर; नांदेडमध्ये मिठाई वाटून स्वागत
खा. अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी छापे
ऑपरेशन लोटस की केजरीवालांची मनमानी?
Naveen Jaihind (@NaveenJaihind) • Facebook

अमृतसर : पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षासमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकल्याची चर्चा रंगली आहे. तब्बल 28 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा समोर आल्यानंतर राज्यातील सत्तास्थैर्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे सरकार कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राजकीय वातावरण तापले आहे.
हरियाणातील पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनी हा दावा करत मोठी खळबळ उडवली. त्यांच्या मते, आगामी काही दिवसांत पंजाबमधील सुमारे 28 आमदार पक्षाचा निरोप घेऊ शकतात. त्यामुळे सध्याचे सरकार ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याची तीव्र टीकाही त्यांनी केली. पक्षांतर्गत अस्वस्थता वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जयहिंद यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, अलीकडे पक्ष सोडून गेलेल्या काही खासदारांवर दबाव टाकण्यात आला होता. त्यांच्याशी गैरवर्तन झाले, तसेच मारहाणीचे प्रकारही घडल्याचा दावा त्यांनी केला. या पार्श्‍वभूमीवर पक्षातील नाराजी अधिक तीव्र होत असल्याचे ते म्हणाले. या सर्व घडामोडींमुळे पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पंजाबमधील मंत्री बलवीर सिंह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. बलवीर सिंह यांनी भाजपवर ‘ऑपरेशन लोटस’ राबवत असल्याचा आरोप करत, काही खासदारांनी पंजाबच्या जनतेचा विश्‍वासघात केल्याची टीका केली. पुढील वर्षी राज्यात निवडणुका होणार असल्याने या राजकीय हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी ही परिस्थिती मोठे आव्हान मानली जात आहे. 28 आमदार पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळे आगामी काळात पंजाबच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी स्पष्ट केले की, पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत संबंधित खासदारांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी राज्यसभेच्या अध्यक्षांकडे लवकरच निवेदन सादर केले जाईल. खासदार संजय सिंह यांच्यामार्फत उपराष्ट्रपतींकडेही याबाबत तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा करण्यात आलेल्या खासदारांच्या संख्येबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. केवळ तीन खासदारांनीच पक्षांतर केले असून इतर काही नावांबाबत बनावट स्वाक्षर्‍यांचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला. एकूणच, या दाव्यां-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमधील राजकारण सध्या अस्थिरतेच्या टप्प्यावर पोहोचले असून येत्या काही दिवसांत परिस्थिती कोणत्या दिशेने वळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS