मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत जोरदार प्रत्युत
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेनंतर काहींनी तथ्यांकांकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत त्यांनी अशा टीकाकारांवर कठोर शब्दांत निशाणा साधला. ही केवळ वाहतूक सुविधा नसून देशाच्या अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, दरड कोसळल्यानंतर काही जणांनी प्रकल्पच अपयशी ठरल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात शासन यंत्रणेने अत्यंत वेगाने काम करत अवघ्या 18 तासांत वाहतूक पूर्ववत केली. त्यामुळे अफवा पसरवणार्यांच्या दाव्यांना प्रत्यक्ष कामगिरीतून उत्तर मिळाले, असे त्यांनी नमूद केले. फडणवीस म्हणाले, माझ्यावर टीका करा, सरकारवर टीका करा; पण महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. राज्याच्या प्रगतीला डाग लावणार्यांना योग्य उत्तर दिले जाईल. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक माध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश आणि चित्रफिती प्रसारित करणार्यांवरही टीका केली. काही जणांनी अपूर्ण आणि चुकीची माहिती देत प्रकल्पाबाबत भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळणार्या अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरड कोसळण्याच्या घटनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशा घटनांमधून भविष्यासाठी शिकण्याची संधी मिळते. पावसाच्या पाण्याचा प्रवाह, डोंगररचनेतील बदल आणि दरडी कोसळण्याची कारणे यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. यासाठी देशातील नामांकित तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेत नवीन सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येतील. त्यांनी सांगितले की, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अधिक सक्षम संरक्षक व्यवस्था उभारली जाईल, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षितता आणखी बळकट होईल.
धाडसी निर्णयामुळे साकारला प्रकल्प
मिसिंग लिंक प्रकल्पाच्या इतिहासाचा आढावा घेताना फडणवीस यांनी सांगितले की, पूर्वी हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगत तो बंद करण्यात आला होता. मात्र अभियंते, तज्ज्ञ आणि अधिकार्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आणि त्यानुसार कामाला गती दिली. त्यांच्या मते, मोठे पायाभूत प्रकल्प उभारताना सुरुवातीला अनेक अडचणी येतात. मात्र प्रत्येक अनुभवातून सुधारणा करत पुढे जाणे हाच विकासाचा मार्ग आहे.
पूरमुक्तीसाठी 13 हजार कोटींचा आराखडा
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि पायाभूत सुविधांबाबत विधानसभेत नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाची आकडेवारी मांडत सरकारच्या उपाययोजनांचा तपशील दिला. यावेळी त्यांनी मुंबईत केवळ सहा दिवसांत संपूर्ण जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे सांगितले. तसेच मुंबईची तुंबई रोखण्यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती दिली

COMMENTS