Homeताज्या बातम्या

राज्यात मुसळधार पावसाचा तडाखापुणे-सातार्‍याच्या घाटमाथ्यावर जनजीवन विस्कळीत

मुंबई : राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्यात राहिलेली पावसाची तूट

उसदरासाठी स्वाभिमानीचे खटाव तालुक्यातून रणशिंग
हिवरसिगा येथे शेतकर्‍यांना केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कपाशी बियाण्यांचे वाटप
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार
मुंबई/पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले  असून, सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसराला बसला ...


मुंबई : राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्यात राहिलेली पावसाची तूट जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात भरून निघाली असून धरणे, नद्या आणि ओढे वेगाने भरत आहेत. पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावरील भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, मुंबई आणि नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या विसर्गामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. सिंहगड रस्त्यावरील एकता नगर परिसरात काही घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ उडाली. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी ठेवली आहे. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यासह सातारा आणि पश्‍चिम घाट परिसरात पुढील काही तासांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा तसेच लहान नद्यांना पूर येण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पर्यटनस्थळांवर जाणार्‍या नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रेल्वे स्थानक परिसर जलमय झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला असून स्थानिक प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच घाटमाथ्यालगतच्या भागांत जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी शेतीची कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती दक्षता घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार 9 जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 10 जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहणार आहे. 11 जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई वेधशाळेने नागरिकांनी स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पश्‍चिम किनारपट्टीसह उत्तर आणि वायव्य भारतातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित राज्यांतील प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

COMMENTS