Homeताज्या बातम्या

आज नाशिक-त्र्यंबकेश्‍वरमध्ये ढगफुटीची शक्यता

मुंबई : नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर परिसरात आज मंगळवारी 7 जून रोजी तीव्र ढगफुटी होण्याची दाट शक्यता असून, एकाच दिवसात तब्बल 300 मिमी इतका विक्रमी पा

पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; वाहतूक ठप्प
राज्यात पावसाचा जोर ओसरला
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा धुमाकूळराज्यात 49 रस्ते, 42 वीज ट्रान्सफॉर्मर बंद
नाशिकला आज ढगफुटीचा इशारा


मुंबई : नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर परिसरात आज मंगळवारी 7 जून रोजी तीव्र ढगफुटी होण्याची दाट शक्यता असून, एकाच दिवसात तब्बल 300 मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतची माहिती देत नाशिक जिल्ह्याला सर्वात महत्त्वाचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिकचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. नाशिक जिल्हा परिषद आणि स्थानिक यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात पावसाचा ’रेड अलर्ट’ असल्याने काही तातडीचे निर्णय घेण्यात आले आहेत.

COMMENTS