Homeताज्या बातम्या

शोपियांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबविलेल्या व्यापक संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका दहशतवाद्याचा खात्मा क

कॅफेच्या नावाखाली सुरू होते अश्लील चाळेकर्जत पोलिसांची कारवाई, दोन जोडपी ताब्यात
राजधानीत दहशतवादी कट उधळलाचार संशयितांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त
ढवळगाव शिवारात गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्तदोन आरोपींना अटक ; बेलवंडी पोलिसांची कामगिरी
Top Lashkar-e-Taiba commander Zakir Ganai killed in encounter in J&K's  Shopian - India Today


श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबविलेल्या व्यापक संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरून शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला असून, परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता लक्षात घेऊन शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
सुरक्षा यंत्रणांना काही दिवसांपूर्वी शोपियां जिल्ह्यातील सैदापोरा परिसरातील जंगलात लष्कर-ए-तैयबाचे दोन स्थानिक दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी संयुक्तपणे संपूर्ण परिसराला वेढा घालत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. ही कारवाई सलग पाच दिवस सुरू होती. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील चार गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. जंगल परिसरात कोणतीही जीवितहानी होऊ नये आणि दहशतवाद्यांना पळून जाण्याची संधी मिळू नये, यासाठी सर्व मार्गांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा दलांच्या माहितीनुसार, वेढ्यात अडकलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे लतीफ आणि जाकीर अशी असून ते दक्षिण काश्मीरातील कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रभावी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी परिसराची तपासणी करताना सुरक्षा दलांना एका दहशतवाद्याचा मृतदेह आढळला. त्याची ओळख लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी म्हणून करण्यात आली. घटनास्थळावरून बंदुका, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्यही जप्त करण्यात आले. परिसरात दुसरा दहशतवादी अद्याप लपून बसल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सैन्याच्या विशेष दहशतवादविरोधी विक्टर दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू असून प्रत्येक संशयित ठिकाणाची झाडाझडती घेतली जात आहे.

COMMENTS