Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाडेगावच्या नववधूचे आधी लगीन परीक्षेसोबत; परिक्षेनंतर निरेत संपन्न झाला विवाह सोहळा

लोणंद : विवाहापूर्वी महाविद्यालयातून परिक्षा देऊन बाहेर पडताना नववधू. (छाया : सुशिल गायकवाड) तरडगाव / प्रतिनिधी : लग्न आणि परिक्षा एकाच दिवशी येता

जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा; विशेष बैठक लावून कालव्यांच्या भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लावा : पालकमंत्री
वाढणार्‍या वीजेच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणची वीज चोरीविरोधात कडक मोहीम
इस्लामपूर येथील 400 कुटुंबियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी

तरडगाव / प्रतिनिधी : लग्न आणि परिक्षा एकाच दिवशी येतात तेंव्हा वधू-वरांसह घरच्या मंडळींसमोर ही मोठा पेच निर्माण होतो. दोन्ही एकाचवेळी आल्याने आता काय करायचे म्हणून काहीतरी निर्णय ही घ्यावे लागतात. तारीख पुढे ढकलली ही जात असते. तर त्याच दिवशी दोन्ही कुटूंबाकडून एकमेकांना समजून घेत दोन्ही जबाबदार्‍या पार पाडण्याची किमया केली जाते. तारीख तीच ठेवून वेळेत बदल करून एक चांगला मार्ग काढला जात असतो. पाडेगाव, ता. फलटण येथील एका नववधूच्या बाबतीत ही असेच काहीसे घडलेले आहे. एकाच दिवशी लग्न आणि परिक्षा आल्याने या नववधूने परीक्षा देऊन लग्नात ही हजेरी लावत लग्न सोहळा ही झाला आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेची तारीख नेमकी लग्नाच्या दिवशी आल्याने नववधू रुपाली बापूराव मदने हिने दोन्ही कुटूंबातील सकारात्मक संवादाने दोन्ही कर्तव्ये बजावलेली आहेत.
लोणंद, ता. खंडाळा येथे शरदचंद्र पवार महाविद्यालयात रुपाली मदने तृतीय वर्षासाठी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून रुपालीला परीक्षेस सामोरे जात असताना लग्न सुध्दा समोर होते.लग्नाची तारीख दोन महिन्यापूर्वीच ठरविण्यात आलेली होती. परंतू विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या स्ट्राईकमुळे ठरलेल्या वेळेत ज्या परीक्षा होणार होत्या. त्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परंतू जेंव्हा नव्याने परीक्षेचे वेळापत्रक सादर झाले तेंव्हा दि. 25 जुलै रोजी नववधू रुपालीचा इंग्रजीचा पेपर आणि लग्न हे एकाच दिवशी आल्याचे लक्षात आले.
ज्याच्या सोबत त्यांचा विवाह होणार होता ते उत्तम दत्तात्रय खरात सुध्दा पाडेगाव, ता. फलटण येथीलच असल्याने त्यांच्यासह त्यांच्या घरातील कुटूंबियांनी ही अडचण सोडविण्यास मदत केली. आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे असे नरवीर तानाजी मालुसरे यांनी ज्या पध्दतीने म्हटले होते. तसेच काहीसे या लग्नाबाबत आधी लगीन वधूच्या परीक्षेचे… मग वधू-वरांचे लगीन जणू असाच काहीसा निर्णय घेतल्याने रुपालीला आज परीक्षेस ही जाता आले. विवाह सोहळा ही संपन्न झाला. हा विवाह सोहळा पुरंदर तालुक्यातील निरा येथे होताना वधूने दिलेल्या परीक्षेची ही विशेष कौतूकाने झाली. परीक्षेच्या वेळी जाताना सगळ्यांचे लक्ष नव वधूकडेच होते. कॉलेजमध्ये ही सहकारी मैत्रिणी शिक्षकवर्ग यांनीही या शालेय परिक्षेसोबतच ही वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. परीक्षा आणि लग्न या दोन्ही बाबी एकाच दिवस आणण्यासाठी वेळेत बदल करावा लागला. परीक्षा लग्नविधीच्या वेळेत म्हणजे दुपारी असल्याने ती वेळ संध्याकाळची करण्यात आली. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाने शैक्षणिक कार्यासोबत वैवाहिक कार्य पार पडलेल्याने या अनोख्या लग्न सोहळ्याचे दोन्ही परिवारातील कुटुंबांचे कौतुक केले.
परीक्षेला महत्व दिल्याने दोन्ही परिवारातील कुटुंबांचे कौतुक
वैवाहिक जीवनातील टप्प्यासोबत शैक्षणिक प्रवासातील टप्प्याला ही महत्व दिल्याने नववधू-वरासह दोन्ही कुटूंबीयांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. आजही समाजात लग्नाच्या विधीच्या वेळेला विशेष जपले जाते आहे. लग्न विधी हा वेळेवरच झाला पाहिजे म्हणून आग्रह ही धरला जात असतो. परंतू इथे विधीची वेळ बदलून वधूच्या परीक्षेला विशेष महत्व देताना जे दोन्ही परिवारातील सकारात्मक संवादाने निर्णय घेतले. या निर्णयाबद्दल एक कौतुकास्पद आणि आदर्शवादी असाच समजूतदारपणा पाहायला मिळालेला आहे. आजही ही समाजात क्षुल्लक कारणावरून लग्न सोहळ्यात अडचणी आणल्या जात असतात. परंतू अशावेळी सोहळ्यातील अडचणीला एकमेकांमध्ये चांगला संवाद घडवून आणून कार्य पार पाडणे आवश्यक असते. या निर्णयात वराकडील कुटूंबाचे सुध्दा जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
26-1

COMMENTS