Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदाननागपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा समावेश ; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघां

4 हजार 250 कोटींचा हेलिप्लांट प्रकल्प हवेतच ?उद्योगमंत्री उदय सामंतांच्या वक्तव्याने नांदेडमध्ये राजकीय भूकंप
उन्हाचा वाढता पारा अन् दररोज शेकडो शुभकार्यांना उपस्थित राहणारं धस कुटुंबजनतेशी जपलेलं आत्मीयतेचं नातं..!
‘कोण होता शिवाजी’ पुस्तकाचे वाचन उपक्रम; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचा पुढाकार


मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, 22 जूनला मतमोजणी केली जाणार आहे. यामध्ये 16 जागांसाठी नियमित निवडणूक तर नागपूर मतदारसंघात एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नागपूर मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे अनेक मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून केली जाते. संबंधित मतदारसंघातील किमान 75 टक्के मतदार उपलब्ध असल्यास निवडणूक घेण्याचा नियम आहे. आता आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 25 मे रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जूनपर्यंत असेल. त्यानंतर 2 जून रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांना 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. सर्व मतांची मोजणी 22 जून रोजी होऊन निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकांमुळे अनेक राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या असून, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने या निवडणुकांकडे महत्त्वाच्या राजकीय चाचणी म्हणून पाहिले जात आहे.
विधान परिषदेची रचना कशी असते?
महाराष्ट्र विधान परिषद ही राज्याची उच्च सभा मानली जाते. या सभागृहात एकूण 78 सदस्य असतात. त्यापैकी 30 सदस्यांची निवड विधानसभा सदस्यांकडून केली जाते. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून निवडले जातात. याशिवाय 7 सदस्य पदवीधर मतदारसंघातून, तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून येतात. उर्वरित 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींमधून केली जाते.
या मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक
राज्यातील सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.

COMMENTS