भाळवणी : रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अतुल भालेराव यांची रिपब्लिकन सेनेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अतुल भालेराव यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. गेल्या दहा वर्षापासून अतुल भालेराव हे सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. सध्या समाजातील गटातटाच्या व फुटीरतावादी वातावरणामध्ये देखील भालेराव हे जातीजातींमध्ये बंधुभाव टिकून राहावा व सामाजिक सलोखा वाढावा यासाठी सतत कार्यरत आहेत.पारनेर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध असतात. म्हणूनच या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांनी पुढील काळात देखील रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शोषित, वंचित, शेतकरी व कष्टकरी बहुजन समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. या निवडीचे बहुजन चळवळीतील कार्यकर्ते राजेंद्र करंदीकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, दिलीपराव साळवे, हिरामण सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ पटेकर यांनी अभिनंदन केले आहे. या बैठकीला कानिफ आंबेडकर, बापू चेमटे, महेश पंडित, धनंजय साठे, दत्ता रोहोकले, आकाश भालेराव, साहेबराव मधे, पवन भालेराव, अजित तुपे, अमन तांबोळी, सुधीर सोनवणे, हरीश सूर्यवंशी, बाळासाहेब जाधव, सलीम शेख, प्रकाश पटेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात रिपब्लिकन सेनेच्या गावागावात शाखा स्थापन करण्याचा संकल्प अतुल भालेराव यांनी व्यक्त केला.

COMMENTS