किरकोळ वादावरून हवेत गोळीबार करणारा हत्यारासह कर्जत पोलिसांच्या ताब्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरकोळ वादावरून हवेत गोळीबार करणारा हत्यारासह कर्जत पोलिसांच्या ताब्यात

कर्जत/प्रतिनिधी : भरत नामदेव मांडगे, वय ४५ वर्षे, धंदा : शेती रा. रेहकुरी ता. कर्जत समक्ष कर्जत पोलीस स्टेशनला हजर होवून लेखी फिर्याद दिली की रेहेकुर

वडापाव दुकानदाराचा प्रामाणिकपणा ; ९० हजार रुपये केले परत
कोपरगाव बाजार समितीत जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू-स्नेहलता कोल्हे.
दिव्यांग व ज्येष्ठांना केंद्राने दिला आधार : मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांचे प्रतिपादन

कर्जत/प्रतिनिधी : भरत नामदेव मांडगे, वय ४५ वर्षे, धंदा : शेती रा. रेहकुरी ता. कर्जत समक्ष कर्जत पोलीस स्टेशनला हजर होवून लेखी फिर्याद दिली की रेहेकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थान जमिन गट नंबर ७०,७१,७२,७३ मध्ये एकुण ७५ एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र बरेच वर्षापासून आमचे भावकीतील पुर्वीचे चार कुटूंब वहीत करून शेत जमिन खात होते. 
कोकनाथ महादेव मंदिराची आम्ही देखभाल करीत होतो परंतु आमचे भावकीतील संदिप छगन मांडगे याने वरील चारही शेत गटाची देवस्थानाचे नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याचे घरातील सर्व अध्यक्ष व सभासद केलेले आहेत. संदिप छगन मांडगे याने इतर दुस-या भावकीतील लोकांचा काही एक संबंध नाही व इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी येथे दावा दाखल केलेला आहे.
 त्यावरून मला व आमचे भावकीतील लोकांना ३० डिसेंबर रोजी उपविभागीय दंडाधिकारी कर्जत विभाग कर्जत येथे तारीख असल्याने मी व आमचे भावकीतील बरीच मंडळी तारखेस आलेलो होतो. कर्जतचे उपविभागीय दंडाधिकारी येथील तारीख झाल्यानंतर मी, शांतीलाल बाबु मांडगे वय ६९ वर्षे रोहीदास खंडू मांडगे, वय ७५ वर्षे, शहाजी बाबू मांडगे, वय ५५ वर्षे, आश्रु यशवंता मांडगे, वय ७५ वर्षे, भानुदास यशवंत मांडगे, वय ८० वर्षे, हारीभाऊ आन्ना मांडगे, वय ५५ वर्षे, नारायण देवीदास मांडगे, वय ५० वर्षे, आप्पा गंगाराम मांडगे, वय ५५ वर्षे, धनराज खंडू मांडगे, वय ५० वर्षे सर्व रा. रेहेकुरी ता. कर्जत असे आम्ही सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळ आम्ही थांबलो असताना त्यावेळी संदिप छगन मांडगे, वय ३२ वर्षे, सचिन छगन मांडगे, वय ३० वर्षे, दोन्ही रा. रेहेकुरी हे तेथे आले. त्यावेळी माझा चुलत भाऊ शहाजी बाबू मांडगे याने त्याची मोटारसायकल मला घरी घेवून जाण्याचे सांगितल्याने मी मोटारसायकल घेवून घरी निघालो होतो.  त्याचवेळी  संदिप छगन मांडगे याने मला ए कुत्र्या तु मोटारसायकल घेवून जावू नको, खाली उतर असे म्हणून त्याने मला शिवीगाळ दमदाटी करून चापटाने मारहाण केली. त्यावेळी आमचे दोघात शाब्दिक बाचाबाची होऊन झटापट चालू असताना संदिप छगन मांडगे याने त्याचे कंबरेचा रिव्हालव्हर काढून मला व माझे सोबत असलेले माझे वरील नातेवाईक यांच्या जिवीतास धोका होऊ शकतो हे माहीत असताना रिव्हालव्हरमधून हवेत फायर केला. त्यानंतर संदिप छगन मांडगे हा निघून गेला. त्याची माहिती फोनवरून मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळास भेट देऊन आरोपीस हत्यारासह ताब्यात घेतले. इतरांचे जीवित धोक्यात येईल अशी कृती करणे आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस ताब्यात घेतले आहे, रिव्हॉल्वर आणि बुलेट (गोळ्या) जप्त करण्यात आल्या आहेत.

COMMENTS