पुणे : सिंहगड रोड परिसरातील सुयोग श्री सोसायटीमध्ये मध्यरात्री काही तरुणांनी गोंधळ घालत पार्किंगमधील सात ते आठ चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घ
पुणे : सिंहगड रोड परिसरातील सुयोग श्री सोसायटीमध्ये मध्यरात्री काही तरुणांनी गोंधळ घालत पार्किंगमधील सात ते आठ चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण हातात हत्यारे घेऊन सोसायटीच्या परिसरात आले. त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करत त्यांच्या काचा फोडल्या तसेच इतर भागांचेही नुकसान केले.

COMMENTS