Homeताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात चार वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात सात भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेत मुलीच्या डो

गायराण जमिनीच्या वादातून खून; आरोपी अवघ्या 6 तासांत जेरबंदगेवराई पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोघांना अटक, एक बालक ताब्यात
शेवगाव पोलिसांनी अवैधपणे दारूची वाहतुक करणारा आरोपी केला गजाआड
पोलिसानेच केली चोरी! , व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस निलंबित.
Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला;  सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक | Navarashtra

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात सात भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेत मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्यावर ८० हून अधिक टाके पडले आहेत. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील चिखली भागात राहणाऱ्या गिरधर मिश्रा यांची चार वर्षांची मुलगी घराजवळ असलेल्या एका झाडाची पाने तोडण्यासाठी बाहेर गेली होती. ती झाडाजवळ पोहोचली असता तिथे असलेल्या सात कुत्र्यांच्या टोळक्याने तिला घेरले होते.

COMMENTS