बीड: मौलाना आझाद फाऊंडेशनच्या राज्य प्रवक्तेपदी मुशीर इनामदार यांची निवड करण्यात आली. या नियुक्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील

बीड: मौलाना आझाद फाऊंडेशनच्या राज्य प्रवक्तेपदी मुशीर इनामदार यांची निवड करण्यात आली. या नियुक्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मुशीर इनामदार यांचे अभिनंदन केले आणि संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी इल्यास इनामदार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मौलाना आझाद फाऊंडेशनला सुरू होऊन अवघे आठ महिने झाले असले तरी या अल्पावधीत संघटनेने आठ वर्षांच्या कामाइतके उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकार्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अदनान खान यांनी सांगितले की, राज्य प्रवक्त्याची जबाबदारी योग्य आणि प्रामाणिक व्यक्तीकडे सोपविण्यात आली आहे. मौलाना आझाद फाऊंडेशनने एक सक्षम, कर्तृत्ववान आणि समाजाप्रती समर्पित व्यक्तीची निवड केली आहे. मुशीर इनामदार हे माझेही मार्गदर्शक असून त्यांच्या माध्यमातून संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खुर्शीद आलम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अनेक संघटना काही काळानंतर निष्क्रिय होतात. मात्र त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे योग्य नेतृत्वाचा अभाव. मौलाना आझाद फाऊंडेशनने बोलण्याची क्षमता, संघटन कौशल्य आणि समाजाप्रती बांधिलकी असलेल्या व्यक्तीवर राज्य प्रवक्त्याची जबाबदारी सोपवली आहे. समाज आणि कौमच्या हितासाठी काम करणार्या प्रत्येक संघटनेसोबत आपण कायम उभे राहू, असेही त्यांनी सांगितले.
शफीक भाऊ यांनी अरफात खान आणि सय्यद सलमान यांचे आभार मानत सांगितले की, कमी कालावधीत प्रभावीपणे संघटना कशी उभी करावी, याचे उत्तम उदाहरण मौलाना आझाद फाऊंडेशनने घालून दिले आहे. अनेक संघटना केवळ नावापुरत्या राहतात, मात्र ही संघटना सातत्याने समाजहितासाठी कार्यरत आहे. नियत स्वच्छ असेल तर यश निश्चित मिळते, असे सांगत त्यांनी मुशीर इनामदार यांना राज्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुशीर इनामदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संघटनेला अवघे आठ महिने झाले असले तरी समाजहिताची अनेक कामे करण्यात आली आहेत. अरफात खान यांनी समाजाचे भले व्हावे या उद्देशाने संघटनेची स्थापना केली असून, महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांवर चालत समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS