Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन के.एस.पी. विद्यालयात उत्साहात साजरी

बीड प्रतिनिधी - शहरातील (कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालय) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन के.एस.पी. विद

प्रेमसंबंधातून आई वडिलांसमोर अल्पवयीन मुलीचे केले अपहरण
संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन
महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 20 ऑगस्टला प्रदान सोहळा

बीड प्रतिनिधी – शहरातील (कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालय) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन के.एस.पी. विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष सौ. अंजलीताई शेळके,प्र.मुख्याध्यापक विशाल सुपेकर व शाळेतील शिक्षक कर्मचार्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला मनोगत व्यक्त करतांना मान्यवर म्हणाले की, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. ’शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या जिव्हाळ्याचे. अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ’कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकर्‍यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS