Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घ्यावी : आ.काळे

कोपरगाव : मतदारसंघातील काही गावांमध्ये सोमवारी (दि.३०) विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीमुळे गहू, कांदा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या कांदा आणि गहू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार आणि महसूल विभागाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.   रब्बी हंगामातील गहू, कांदा, काढणी झालेला कांदा, कलिंगड, द्राक्ष बागा या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. फळबागांचे देखील प्रचंड नुकसान झाले असून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आधीच संकटात असताना या अवकाळी पावसाने शेतीचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीतही महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आ.  काळे यांनी तहसीलदार महेश सावंत आणि तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिले आहेत.

अवाजवी घरपट्टी विरोधात कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे धरणे    
गौतम सहकारी बँकेस चार कोटींचा नफा  
शहापूर शिवारात विवाहित महिलेचा आढळला विहिरीत मृतदेह 

कोपरगाव : मतदारसंघातील काही गावांमध्ये सोमवारी (दि.३०) विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीमुळे गहू, कांदा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या कांदा आणि गहू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार आणि महसूल विभागाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

  रब्बी हंगामातील गहू, कांदा, काढणी झालेला कांदा, कलिंगड, द्राक्ष बागा या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. फळबागांचे देखील प्रचंड नुकसान झाले असून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आधीच संकटात असताना या अवकाळी पावसाने शेतीचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीतही महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आ.  काळे यांनी तहसीलदार महेश सावंत आणि तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिले आहेत.

COMMENTS