छत्रपती संभाजीनगर : माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांची वारकरी परिषदेच्या अध
छत्रपती संभाजीनगर : माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांची वारकरी परिषदेच्या अध्यक्षपदी तर शेतकरी नेते, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांची शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्यप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आज दि. ९ रोजी आयोजित केला आहे.
हा सत्कार सोहळा सुप्रसिद्ध लोककवी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अभियंता बळीराम किनाळकर राहणार आहेत. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीत दुपारी १.०० वाजता हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने अनिल फड, सतीश निकम, रणजित ढेपे, शिवाजी हिवाळे, शिवाजी बनकर, अॅड. रमेश वाकडे, अॅड. पंडित आनेराव, वैजनाथ वाघमारे, बालाजी पापुलवाड, नामदेव कांबळे यांनी केले आहे.

COMMENTS