Homeताज्या बातम्या

हडपसरमध्ये अल्पवयीन टेम्पोचालकाने उडवले चार वाहने

पुणे : हडपसर आणि वैदूवाडी परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत मोठा गोंधळ निर्माण केला. वाहतूक पोलिसांच्या इशार्‍याकडे दुर्लक

देहविक्रीप्रकरणी मराठी अभिनेत्रीची सुटका
ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगितडॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने पोलीस प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा
पाटोदा पोलिसांकडून 14.80 लाखांचा गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ नष्ट
Hadapsar Tempo Chase: Minor Driver Hits Four Vehicles, Evades Police


पुणे : हडपसर आणि वैदूवाडी परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत मोठा गोंधळ निर्माण केला. वाहतूक पोलिसांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून पळ काढताना त्याने चार वाहनांना धडक दिली. अखेर नागरिकांच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहरात काळ्या काचा आणि आकर्षक क्रमांकफलक असलेल्या वाहनांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेदरम्यान वैदूवाडी परिसरात वाहतूक पोलिसांनी संशयास्पद टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले आणि पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसह काही नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. या वेळी संबंधित चालकाने अत्यंत बेदरकार पद्धतीने वाहन चालवत रस्त्यावरील तीन ते चार वाहनांना धडक दिली. काही ठिकाणी पोलिसांच्या दिशेनेही वाहन वळविण्याचा प्रयत्न झाल्याचे दृश्य चित्रफितींमध्ये समोर आले आहे. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पंधरा क्रमांकाच्या चौकाजवळ एका मोठ्या वाहनाच्या मदतीने टेम्पोचा मार्ग रोखण्यात आला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला पकडले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत चालकाला सुरक्षितपणे ताब्यात घेत हडपसर पोलीस ठाण्यात नेले. धडक बसलेल्या वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असले, तरी कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित चालक अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्याचे वय केवळ 17 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी चालक आणि वाहन संबंधित पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन सोपविल्याप्रकरणी वाहनमालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 110 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जबाबदारीशिवाय वाहन चालविण्यास परवानगी देणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

COMMENTS