स्व.विनायकराव मेटे यांच्या अस्थिकलशाचे पंचवटी नाशिक येथे विधिवत विसर्जन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व.विनायकराव मेटे यांच्या अस्थिकलशाचे पंचवटी नाशिक येथे विधिवत विसर्जन

बीड : शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या अस्थिकलशाचे आज नाशिक पंचवटी येथे पत्नी डॉ.ज्योतीताई मेटे,त्यांचे बंधू रामहरी

डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण
सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे चोरीचा उलगडा; नातेवाईकाच्या बचावासाठी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची धडपड
सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार

बीड : शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या अस्थिकलशाचे आज नाशिक पंचवटी येथे पत्नी डॉ.ज्योतीताई मेटे,त्यांचे बंधू रामहरी मेटे  यांच्या उपस्थितीमध्ये अस्थिचे विसर्जन करण्यात आले.  स्व.विनायकरावजी मेटे यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबई येथे येत असताना अपघाती दुखद निधन झाले . त्यांच्या निधनानंतर शिवसंग्राम परिवार व मेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला . यानंतर त्यांच्या अस्थिंचे बीड जिल्हाभरातील वंचित उपेक्षित व सर्वसामान्य नागरिकांना अस्थि रथ दर्शन घेता यावे यासाठी जिल्हाभरामध्ये चार दिशेने अस्थिरथ रवाना करण्यात आले होते . या अस्थिचे दर्शन घेताना अनेकांनी साश्रूनयनांनी दर्शन घेतले . तसेच स्वर्गीय मेटे साहेबां सोबतच्या आठवणीना उजाळा देत वंचित उपेक्षितांचे नेतृत्व हरवलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त होत आहे .
          आज स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या एका अस्थिकलशाचे धर्मग्रंथातील पवित्र क्षेत्र मानले जाणारे जिथे प्रत्यक्ष रामायणामध्ये राम -सीता आणि लक्ष्मण यांचा सहवास होता अशा पवित्र मानल्या जाणाऱ्या  पंचवटी या ठिकाणी  अस्थिकलशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले . या प्रसंगी त्यांच्या पत्नी डॉ.ज्योतीताई मेटे, त्यांचे बंधू रामहरी मेटे, तसेच शिवसंग्रामचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष शरदजी तुंगार , महानगर प्रमुख अमितजी जाधव, उपाध्यक्ष मच्छिंद्रजी कुरे, जिल्हा उपाध्यक्ष दशरथजी खैरनार, प्रा.सुभाष जाधव,  शिवसंग्राम युवक अध्यक्ष,(महाराष्ट्र राज्य)उदयकुमार आहेर, नितीन लाटकर, बबनराव जाधव, आकाश जाधव श्री.महेश गाढवे, श्री.सुनीलजी बोराडे, श्री.विकासजी भालेकर ,विनोद कवडे, विजय डोके, तथा पदाधिकारी व  कार्यकर्ते व नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते .

COMMENTS