Homeताज्या बातम्या

स्व. विखे पाटलांचे दुष्काळमुक्तीचे स्वप्न ना. राधाकृष्ण विखेंनी पूर्ण करावे; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर : "स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिलेले महाराष्ट्र दुष्काळमुक्तीचे स्वप्न त्यांचे सुपुत्र व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे

आश्वी बुद्रुक येथे प्रवरेच्या कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; शेतकऱ्यांना करणार आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
चालुक्य वंशजांनी एकाच छत्राखाली यावे; भोर येथील सोनवणे परिवार स्नेह मेळाव्यात दीपक साळुंखे यांचे प्रतिपादन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायी; प्रा. टी. ई. शेळके यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर : “स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिलेले महाराष्ट्र दुष्काळमुक्तीचे स्वप्न त्यांचे सुपुत्र व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारकिर्दीत पूर्ण व्हावे,” अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केली. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली, त्याप्रसंगी हजारे बोलत होते. या भेटीदरम्यान विखे पाटील यांनी हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी भाजपचे जिल्हा समन्वयक विनायकराव देशमुख उपस्थित होते.

या अनौपचारिक चर्चेदरम्यान मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची तसेच राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून प्रामुख्याने कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारितील नवीन प्रकल्प सुरू करण्यात येत असून, धरणातील गाळ काढण्याच्या धोरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा धरणाचा समावेश केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाने राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या कामांना विशेष प्राधान्य दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या कामांना गती मिळत असल्याबद्दल अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले. हजारे म्हणाले की, “स्व. बाळासाहेब विखे यांनी कोकणातील पाणी घाटमाथ्यावर आणण्याच्या संदर्भात आणि नदीजोड प्रकल्पाबाबत तज्ञांच्या मदतीने एक महत्त्वपूर्ण आराखडा तयार केला होता. या नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणून आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे स्वप्न साकार करावे.”

COMMENTS