Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमरी महसूल विभागाची धडक कारवाई; गोदावरीतून 50 लाखांच्या 5 फायबर बोटी नष्ट

उमरी : तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशावर महसूल व पोलीस विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत 5 फायबर बोटी नष्ट

चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 30,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त
अवैध वाळू माफियांचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला संतप्त गावकऱ्यांनी नगरसेवकासह आरोपीला चोपल
गाजावाजा न करता एलसीबीत बदल; अतुल भोसले यांच्या खांद्यावर गुन्हेगारी रोखण्याची मोठी जबाबदारी

उमरी : तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशावर महसूल व पोलीस विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत 5 फायबर बोटी नष्ट केल्या. नष्ट करण्यात आलेल्या बोटींची अंदाजे किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
माहितीनुसार, इळेगाव येथे 4 तर भायेगाव येथे 1 अशा एकूण 5 फायबर बोटी वाळू उपशासाठी वापरात असल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच उमरीच्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, नायब तहसीलदार संजय सोलनकर, मंडळ अधिकारी किरण काबळे, ग्राम महसूल अधिकारी वैभव डगे तसेच भायेगावचे पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला. कारवाईनंतर जप्त केलेल्या सर्व फायबर बोटी जिलेटीनच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या. या धडक कारवाईमुळे उमरी तालुक्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध वाळू उपसा करणार्‍यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS