Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई पोलीसांची मोठी कारवाई; म्हाळसपिंपळगाव शिवारात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा उघड, दोन ट्रॅक्टर जप्त

चकलंबा : गेवराई पोलीसांनी म्हाळसपिंपळगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टर व केनीसह सुमारे

ऑपरेशन क्रॅकडाउनची धडक कारवाई : इस्लापूर परिसरात अवैध दारूवर मोठा प्रहार
उमरी महसूल विभागाची धडक कारवाई; गोदावरीतून 50 लाखांच्या 5 फायबर बोटी नष्ट
अवैध वाळू माफियांचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला संतप्त गावकऱ्यांनी नगरसेवकासह आरोपीला चोपल

चकलंबा : गेवराई पोलीसांनी म्हाळसपिंपळगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टर व केनीसह सुमारे 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी ही कारवाई केली. दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सकाळी 11:10 वाजता मौजे म्हाळसपिंपळगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान केनीच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. घटनास्थळी विनाक्रमांकाचे दोन ट्रॅक्टर आढळून आले. पोलीसांनी दोन्ही ट्रॅक्टर व केनी जप्त करून एकूण अंदाजे 13,00,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सर्व मुद्देमाल पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पवार, ग्रेड पोउपनि सुरेश सफौ/1045 नितीन शिंदे, पोह/223 कल्याण राठोड, पोकॉ/241 गोरक्ष डोके, पोकॉ/2198 धिरज खांडेकर आणि पोकॉ/2104 ऋषी पोटे यांनी सहभाग घेतला. अवैध वाळू उपशावर गेवराई पोलिसांची ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS