Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड शहरातील कौठा भागातील आगीत टेन्टचे गोदाम भस्मसात; लाखोंचे नुकसान; अग्निशमन दल व पोलिस मदतीला

नांदेड : शहरातील महेश नगर कौठा भागातील मंडप साहित्याच्या गोदामाला शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे साहित्य खाक झाले आहे. त्यामुळे दुक

जयपूर-बिहार महामार्गावर बसला भीषण आग; प्रवासी नसल्याने अनर्थ टळला!
कॅन व कंटेनरमधून बेकायदेशीर इंधन विक्री; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न
नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
कौठा भागातील शिवशंकर मंडप डेकोरेशनच्या गोदामाला रात्री आग लागून लाखोंचे  नुकसान #nanded #news #instadaily #viralvideos #fire | Namaste Nanded |  Facebook

नांदेड : शहरातील महेश नगर कौठा भागातील मंडप साहित्याच्या गोदामाला शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे साहित्य खाक झाले आहे. त्यामुळे दुकानदाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही.
दि. 1 मे कामगार दिन शुक्रवारी होता. शहरातील कौठा भागातील महेश नगर परिसरात लग्न मंडप साहित्याचे मोठे गोदाम आहे. शुक्रवारी रात्री 7.30 च्या दरम्यान या गोदामाला अचानक आग लागली. त्याचवेळी वारेही जोराने वाहत असल्याने आग वेगाने पसरली. या गोदामाजवळ मोठ्या प्रमाणावर झाडीझुडपे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत गोदामातील लग्न व समारंभाच्या साहित्याची राख झाली. ही आग लागल्यानंतर परिसरातील रहिवासी, दुकान मालकाने लगेच मनपाच्या अग्निशमन दल व नांदेड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटात मनपाच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या व जवान आले आणि त्यांनी आग विझविण्याचे काम सुरू केले. परंतु दीड तास ही आग धुमसत राहिली. तसेच ही माहिती फायर कंट्रोल रूमला देण्यात आली. एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे वाहनही घटनास्थळी बोलावण्यात आले. आगीवर तिन्ही बाजूने डिलिव्हरी होजच्या मदतीने पाण्याचा जोरदार मारा सुरूच राहिला. या आगीत गोदामातील जर्मन हँगर, सुप्रीम चेअर, कारपेट, सोफा, गाद्या, प्लायवूड, रस्सी, हँगर बेल्टसह विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे गोदामाची पत्रेही गरम होऊन खाली पडले. त्यामुळे पाणी मारण्यास व आगीच्या मेन बिंदूपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण होत होती. त्या ठिकाणी जेसीबीला पाचारण करून ते तीन व लोखंडी बांबू जेसीबीद्वारे बाजूला करून आगीवर पाणी मारल्यामुळे ही आग नियंत्रणात आली. गोदामाचे मालक गणराज खिचडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गोदाम 200 बाय 200 फुटांचे होते. या आगीत गोदामातील अंदाजे 50 ते 60 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. तसेच अग्निशमन पथकाच्या मदतीमुळे आणखी 40 लाखांचे साहित्य आगीत भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. ही आग लागल्याचे कळाल्यावर नगरसेवक डॉ. अभिषेक सौदे, नगरसेवक प्रतिनिधी राजू काळे, मंडप असोसिएशनचे विजय परदेशी, धरम परदेशी, नांदेड ग्रामीणचे पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन मदत कार्यात सहकार्य केले. आग विझविण्यासाठी मनपा अग्निशमन विभागाचे  कांबळे, सावल, लांडगे, नरवाडे, कदम, सोडनर, धुळगंडे, चालक नरवाडे यांनी प्रयत्न केले.

COMMENTS