Homeताज्या बातम्या

शेवगाव पोलिसांचा मोठा दणका! सालवडगाव शिवारात अवैध ‘मावा’ कारखान्यावर छापा; ३१ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना ठोकल्या बेड्या!

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दबंग पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंदेवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे

चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 30,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त
गेवराई पोलीसांची मोठी कारवाई; म्हाळसपिंपळगाव शिवारात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा उघड, दोन ट्रॅक्टर जप्त
पाटसकर अशोक गायकवाड टोळीचा मुंबई सा.बां. वर दरोडा

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दबंग पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंदेवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शेवगाव तालुक्यात पोलिसांनी अशाच एका मोठ्या अवैध मावा कारखान्याचा पर्दाफाश केला असून, तब्बल ३१ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शेवगाव तालुक्यातील सालवडगाव शिवारात अवैधरित्या मावा तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी २४ गोण्यांमध्ये भरलेली जाड आणि बारीक नागपुरी सुपारी, तसेच मावा सुपारीच्या पुड्या जप्त केल्या आहेत.
या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एक महिंद्रा पिकअप आणि टाटा एस गाडीसह एकूण ३१ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी इमरान निसार शेख आणि सोहेल अफसर शेख या दोन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, हा माल शेवगाव येथील मुज्जीप मुस्सा शेख आणि परवेज मुस्सा शेख यांचा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या चारही जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि डीएसपी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शेवगाव आणि परिसरातील अवैध मावा आणि गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. फरार असलेल्या इतर दोन मुख्य सूत्रधारांचा शोध पोलीस आता घेत आहेत.

COMMENTS