Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एलसीबीच्या नावाखाली आर्थिक लुटीचा खेळ? व्यापारी वर्गात भीतीचे सावट तीव्र

नांदेड : नांदेड शहरात कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) काही अधिकार्‍यांकडूनच दाबदडपशाही करून आर्थिक वस

भोंदूबाबा खरातचे ‘A’ कोडवर्डचे रहस्य उघड! १६० GB डेटामध्ये काय सापडलं? पाहा सविस्तर व्हिडिओ
SIT ची मोठी कारवाई! अशोक खरातच्या लॅपटॉपमधून धक्कादायक डेटा रिकव्हर; १६ फोल्डर्सनी खरातच्या अडचणी वाढवल्या.
स्टेट बोर्डाच्या शाळांत सीबीएसई पुस्तकांचा सक्तीवाद?पालकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप

नांदेड : नांदेड शहरात कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) काही अधिकार्‍यांकडूनच दाबदडपशाही करून आर्थिक वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. शहरातील नामांकित व्यापारी व उद्योजकांना टार्गेट करून तुम्ही जुगार खेळता, आयपीएलवर सट्टा लावता अशा आरोपांची भीती दाखवत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळले जात असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे, केवळ घरी बसून आयपीएल सामने पाहणार्‍या काही व्यापार्‍यांनाही संशयाच्या जाळ्यात ओढले जात असून, त्यांना फोन करून धमकावले जात असल्याचे समजते. खोटे गुन्हे दाखल करू, पोलीस कारवाईत अडकवू अशा शब्दांत दबाव टाकून आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले जात असल्याने व्यापारी वर्गात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही व्यापार्‍यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, सतत येणार्‍या फोन कॉल्समुळे मानसिक ताण वाढला असून, व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. चांगल्या व्यापार्‍यांना सतत मानसिक तणावाखाली राहावे लागत असल्यामुळे याचा नांदेडच्या व्यवसाय वृद्धीवर परिणाम होऊ शकतो. अगोदरच नांदेडच्या गुन्हेगारी टोळ्या व होणारे खून यामुळे नांदेडचे नाव बदनाम झाले आहे. त्यामुळे चांगल्या व्यापार्‍यांना विनाकारण एखाद्या प्रकरणांमध्ये गोवण्याचा प्रकार केल्यामुळे शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते.   कायद्याच्या चौकटीत राहून अवैध धंद्यांवर कारवाई करणे ही पोलीस यंत्रणेची जबाबदारी असली, तरी निर्दोष नागरिकांना वेठीस धरणे आणि मानसिक छळ करणे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. अशा प्रकारांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असून, प्रामाणिक अधिकार्‍यांच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी व उद्योजकांकडून जोर धरू लागली आहे. तसेच, या प्रकाराची दखल घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, संबंधित कॉल रेकॉर्ड्स व आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशीही मागणी पुढे येत आहे. अन्यथा, रक्षकच भक्षक बनत असल्याची भावना अधिक तीव्र होऊन कायद्यावरील जनतेचा विश्वास डळमळीत होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

COMMENTS