Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घोडेगावजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

सोनई : नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घड

‘गर्भलिंग’ प्रकरणी दोघांना अटक, आरोपींची संख्या २१ वर
आंध्र प्रदेशातील भाजप आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी घेतले शनीदेवांचे दर्शन; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून सत्कार
नेवासेत कचऱ्याचा प्रश्न गंभीर; तीव्र आंदोलनानंतरही नगरपंचायत प्रशासनाची निष्क्रियता कायम, नागरिकांमध्ये संताप
नाशिकमध्ये भीषण अपघात! मद्यधुंद चालकाने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवलं; एकाचा  मृत्यू, 12 जखमी - Marathi News | Nashik accident near chandwad 1 student  died and 12 injured | TV9 ...

सोनई : नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जितेश जानू चव्हाण (वय ३७, रा. मलकापूर, ता. पातूर, जि. अकोला) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेश चव्हाण हे दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगर येथून पुण्याकडे जात होते. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ते घोडेगाव (ता. नेवासा) परिसरात आले असता, त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत त्यांना नेवासा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मृताचे नातेवाईक चरण जानू चव्हाण (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एन. आर. तुपे आणि अन्य कर्मचारी पुढील तपास करत आहेत. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही चित्रफीतसह तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे.

COMMENTS