Homeताज्या बातम्या

अकोलेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

अकोले : भारतीय बौद्धजन विकास समिती, पिंपरी-चिंचवड (पुणे) यांच्या वतीने ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथील मातोश्री लक्ष्मीबाई संगारे आश्रमशाळा तसेच ख

आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना निवेदन : सोमनाथ मोहिते
सारनाथचा ‘जागतिक वारसा’ यादीत समावेश! भारतातील युनेस्को मान्यताप्राप्त स्थळांची संख्या ४५ वर
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता नितीन गडकरी ‘रडारवर’; E20 पेट्रोलविरोधात युवक काँग्रेसचा नागपुरात जनआक्रोश मोर्चा

अकोले : भारतीय बौद्धजन विकास समिती, पिंपरी-चिंचवड (पुणे) यांच्या वतीने ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथील मातोश्री लक्ष्मीबाई संगारे आश्रमशाळा तसेच खुंटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ब्राह्मणवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मातोश्री लक्ष्मीबाई संगारे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश लांडगे, शिक्षक देठे, खुंटेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. भारतीय बौद्धजन विकास समितीच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचा पुरवठा केला जातो. यंदाही ब्राह्मणवाडा परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल गौतम शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे गौतम शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS