Homeताज्या बातम्या

पाथर्डीत भीषण अपघातात चुलत भावांचा मृत्यू

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हमालीचे काम करणाऱ्या दोन होतकरू युवकांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यरात्री न

देगलूरमध्ये ‘अंतरराष्ट्रीय विधवा दिन’ निमित्त ‘एकल महिला दिन’ उत्साहात साजरा
मनपा शाळेमध्ये वाचक विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याचा सृजनशील उपक्रम
अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली पोलिसांवर अतिरिक्त बोजा का? नगरपालिकेने जबाबदारी पार पाडावी; पोलीस हक्क संघर्ष संघटनेची मागणी
Six tourists killed in road accident in Himachal Pradesh's Chamba district  | Akashvani News

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हमालीचे काम करणाऱ्या दोन होतकरू युवकांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यरात्री नेवासा तालुक्यातील वडाळा परिसरात नगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. या घटनेमुळे मिरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरी येथील सचिन उर्फ रोडया मिरपगार व रवी मिरपगार हे दोघे आपल्या इतर मित्रांसह कांद्याच्या गोण्या मालवाहतूक ट्रकमध्ये भरण्याचे हमालीचे काम करण्यासाठी नेवासा तालुक्यातील विविध ठिकाणी जात होते. रविवारी मध्यरात्री एका मालवाहतूक ट्रकमध्ये कांद्याच्या गोण्या भरून दिल्यानंतर सर्वजण रात्री सुमारे १ वाजेच्या दरम्यान आपल्या गावाकडे परतत होते.

दरम्यान, वडाळा परिसरात त्यांच्या दुचाकीला एका चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात सचिन उर्फ रोडया मिरपगार यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या रवी मिरपगार यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्यासोबत असलेले इतर मित्र मिरी येथील महालक्ष्मी देवीची कावड घेऊन गेलेल्या भाविकांकडे वडाळा येथे मुक्कामासाठी थांबले असल्याने ते या दुर्घटनेतून बचावले. एकाच अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने मिरी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हमाली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सचिन उर्फ रोडया मिरपगार आणि रवी मिरपगार हे दोघेही कष्टाळू व होतकरू युवक म्हणून ओळखले जात होते. एकाच अपघातात या चुलत भावांचा मृत्यू झाल्याने मिरपगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मिरी गाव शोकसागरात बुडाले आहे.

COMMENTS