कोपरगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात कोपरगाव शहरातील 'संत ज्ञानेश्वर इंग्लि

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात कोपरगाव शहरातील ‘संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल’ने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल सलग दहाव्या वर्षी १०० टक्के लागला असून, गेल्या १० वर्षांत एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण न होण्याचा अभिमानास्पद विक्रम शाळेने प्रस्थापित केला आहे.
यावर्षी विद्यार्थिनींनी बाजी मारत पहिले तिन्ही क्रमांक पटकावले आहेत:
- प्रथम: नारायणी नितीन शिंदे (९४%)
- द्वितीय: आस्था किशोर देवडे (८९%)
- तृतीय: साईश्री गणेश कानडे (८८.८०%)
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर, विश्वस्त विशाल झावरे व सर्व शिक्षक वृंदाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

COMMENTS