Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी सामूहिक प्रयत्नानांची गरज

सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे प्रतिपादन

अहमदनगर/प्रतिनिधी ः सौर ऊर्जा तयार करून शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हा राज्य शासनाचा अत्यंत

महात्मा गांधी व्यक्ती नसून एक विचार ः प्राचार्य बनकर
मेंढपाळांना पिस्तुल व परवाना द्या ; संघर्ष समितीच्या शेंडगेंची मागणी
देशात व राज्यात परिवर्तनाची लाटः आकाश नागरे

अहमदनगर/प्रतिनिधी ः सौर ऊर्जा तयार करून शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून महावितरणच्या सर्वच अभियंते व कर्मचार्‍यांनी आपला प्रमुख प्रकल्प म्हणून सदर योजना यशस्वी व गतीने अंमलबजावणी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नानांची गरज असल्याचे प्रतिपादन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले. तसेच महावितरणच्या वीज ग्राहकांना सर्वोत्कृष्ठ व अखंडित वीज सेवा देणे हे आपले आद्य कर्तव्य असून यासोबतच थकबाकीदार ग्राहकांकडून वीज देयकांची थकबाकी ऑगस्ट अखेर वसूली करणे सुद्धा अत्यावश्यक असून अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करा असे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले.  
महावितरणच्या नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील सर्व अभियत्यांची व अधिकार्‍यांची आढावा बैठक 23 ऑगस्ट रोजी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे (संजीवनी) सहकारी साखर कारखाना, कोपरगाव येथे  घेण्यात आली. यावेळी बैठकीला मार्गदर्शन करतांना सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे बोलत होते. बैठकीला मंचावर महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, जगदीश इंगळे व प्रकाश खांडेकर आणि स्थापत्य विभागाचे अधिक्षक अभियंता विजय मोरे उपस्थित होते. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा आणि त्यासाठी लागणार्‍या जमिनींची उपलबद्धता या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली. सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा वापर केला तर शेतीसाठी कमी दरात तसेच दिवसा वीज उपलब्ध होईल आणि उद्योगांसाठीच्या वीजदरात लागू केलेली क्रॉस सबसिडी कमी करता येईल. शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा वापरून  वीजनिर्मिती करणे आणि 2025 पर्यंत 30 टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविणे असे ‘मिशन 2025’ या अभियानाच्या माध्यमातून निश्‍चित करण्यात आले असल्याचे श्री. डांगे यांनी सांगितले.  विश्‍वसनीय आणि दर्जेदार वीज पुरवठ्याचे पुनरावलोकन, प्रलंबित ग्राहक तक्रारींची स्थिती, प्रलंबित नवीन जोडणी स्थिती आणि थकबाकी वसुलीचा आढावा मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी यावेळी घेतला. घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसह इतर वर्गवारीची सुद्धा देयके वेळेत भरण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करावा तसेच ऑगस्ट अखेर परिमंडळात सर्वानी वीजदेयकाची शून्य थकबाकी मोहीम यशस्वी करून आणखी गतिमानतेने व उत्कृष्ठ कार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले. बैठकीला नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS