Homeताज्या बातम्या

मुंबई महापालिकेला तुकाराम मुंढेंचा दणका; पालिका मुख्यालयातील कँटीन केले सील!

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात सुरू केलेल्या अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत आता थेट बृहन्मुंबई महानगरपालिका

अहिल्यानगरमध्ये खासगी शाळेच्या प्राचार्यांचे अमानुष कृत्य; तिसरीतील विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबून हवेत टांगले! गुन्हा दाखल
पोटनिवडणुकींचा कौल : हा इशारा की समतोल?
आसाममधील 7 जिल्ह्यात पूरस्थिती ; मृतांची संख्या 87 वर
BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; FDAच्या कारवाईनं खळबळ

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात सुरू केलेल्या अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत आता थेट बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयातील उपहारगृहावरच मोठी कारवाई केली आहे. प्रशासनाच्या पथकाने केलेल्या अचानक तपासणीत स्वच्छतेच्या नियमांचे तीव्र उल्लंघन आढळल्याने हे उपहारगृह तात्पुरते बंद करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे महापालिका कर्मचारी तसेच नागरिकांची भोजन व्यवस्था काही काळासाठी विस्कळीत झाली आहे.

महापालिका मुख्यालयातील या उपहारगृहात दररोज सुमारे सात ते आठ हजार कर्मचारी व नागरिक भोजनासाठी येत असतात. त्यामुळे या कारवाईची संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेक कर्मचाऱ्यांना पर्यायी भोजनाचा आधार घ्यावा लागला.

अन्न व औषध प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. लहान भोजनालयांपासून ते मोठ्या व नामांकित अन्न संस्थांपर्यंत सर्वांची नियमित तपासणी केली जात असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई केली जात आहे.

यापूर्वीही मुंबईतील काही प्रसिद्ध अन्न संस्थांवर स्वच्छतेतील त्रुटींमुळे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अन्न व्यावसायिकांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत कमालीची दक्षता घेतली जात आहे. अलिकडेच मुंबईतील शंभरहून अधिक वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्म या प्रतिष्ठित दुग्ध संस्थेचीही तपासणी करण्यात आली होती. त्यात स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली होती.

COMMENTS