Homeताज्या बातम्या

ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देणारा पोलिस अखेर निलंबित! मुंबई पोलिसांची कारवाई, राजकीय वातावरण तापले

मुंबई: तरुणांना अमली पदार्थांच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेली एक चित्रफित (व्हिडिओ) समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर म

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश
नसरापूर अत्याचार आणि हत्या खटल्यात ६५ वर्षीय आरोपी दोषी; अंतिम शिक्षेचा निर्णय २९ जूनला
रस्ते की पार्किंग? नांदेडची वाहतूक कोंडीत गुदमरली; कोचिंग क्लासेस, बेशिस्त पार्किंग आणि निष्क्रिय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!
Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या  विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल

मुंबई: तरुणांना अमली पदार्थांच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेली एक चित्रफित (व्हिडिओ) समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला अखेर निलंबित केले आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून विरोधकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काँग्रेसच्या विविध नेत्यांनी समाजमाध्यमांवर ही संबंधित चित्रफित प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी काही तरुणांशी संवाद साधताना दिसत असून, “पुन्हा या भागात आढळल्यास खिशात अमली पदार्थ (ड्रग्स) ठेवून गुन्हा दाखल करू”, अशा आशयाची धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही चित्रफित समोर आल्यानंतर त्यावर सर्वस्तरातून व्यापक चर्चा सुरू झाली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी पवन सांगळे या पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले आहे. तो सायन पोलिस ठाण्यात वाहनचालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली असून पुढील आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रसारित झालेल्या चित्रफितीत काही तरुण आणि एक पोलिस कर्मचारी वाहनात बसलेले दिसत आहेत. संभाषणादरम्यान संबंधित पोलिस कर्मचारी धमकी देत असल्याचे स्पष्ट होत असल्याने पोलिसांच्या अधिकारांच्या गैरवापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. विद्यार्थ्यांना किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना अशा प्रकारे धमकावणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासोबतच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

COMMENTS