Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणंद येथे रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण; 31 जुलै रोजी धावणार मॅरेथॉन

लोणंद : रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण प्रसंगी मॅरेथॉन प्रेमी. (छाया : सुशिल गायकवाड) लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे रन विथ बोल्ट द

निर्बंध शिथिल करा अन्यथा उपोषण; महाबळेश्‍वर येथील व्यापार्‍यांचा इशारा
तीन वर्षानंतर मार्डी मार्गे खुंटबावला एसटी बस सुरू; महिला अधिकार परिषदेच्या मागणीला यश
मल्लिकार्जुन मंदिरात शिवभक्तांचा आमरस अभिषेक

लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण करण्यात आले असून मॅरेथॉन प्रेमींसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती बोल्ट द जिम येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली. यावेळी फलकाचे अनावरण करत असताना सर्वांसमोर लोगो प्रकाशित करून 31 जुलै ही तारीख मॅरेथॉन स्पर्धेची घोषित करण्यात आली. तसेच ही मॅरेथॉन स्पर्धा कशा प्रकारे संपन्न केली जाईल. याबाबतची माहिती बोल्ट जिमचे प्रमुख आयर्नमॅन मनोज चव्हाण आणि विनय रावखंडे यांनी दिली.
बोल्ट द जिमचे प्रमुख आयर्नमॅन मनोज चव्हाण, शेखर चव्हाण, लोणंद रनरर्सचे अध्यक्ष विनय रावखंडे, सारंग जाधव, रोहित निंबाळकर हे प्रमुख आयोजक असून लोणंद रनर्स ग्रुप लोणंद, भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुप लोणंद, मयुरेश्‍वर मॉर्निंग वॉक ग्रुप लोणंद, निरा मॅरेथॉन ग्रुप, निरा यांच्या सहकार्याने ही मॅरेथॉन 31 जुलै 2022 रोजी होणार आहे.
या अनावरण प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, राहुल घाडगे, नवनाथ साळुंखे, नीरा मॅरेथॉनचे अध्यक्ष अमेय गारोळे व त्यांचे सहकारी तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शिल्पा पवार, डॉ. स्वप्नाली डोंबाळे, चैताली सुर्यवंशी, डॉ. मनीषा काकडे, एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी, राहुल भंडलकर, राजेंद्र शेळके, संतोष कोकरे, धनंजय घोडके, मंगेश धमाळ, डॉ. उमेश साळुंखे, अ‍ॅड. गजेंद्र मुसळे, तरडगावचे माजी उपसरपंच अमोल गायकवाड, कापडगावचे पोलीस पाटील नंदकुमार खताळ यांच्यासह मान्यवर मॅरेथॉन प्रेमी उपस्थित होते.
ही धावण्याची स्पर्धा 5 कि. मी. तसेच 10 कि. मी. असून अत्यंत निसर्गरम्य परिसरात हा धावण्याचा ट्रॅक असणार आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून 5 कि. मी. स्पर्धेसाठी वय वर्ष 12 पासून पुढील स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार असून 10 कि. मी. स्पर्धेसाठी वय वर्ष 18 पासून पुढील स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये लहांनापासून, युवक, युवती, महिला तसेच ज्येष्ठांना देखील सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी ना-नफा-ना तोटा या तत्वावर आयोजकांनी शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामध्ये आयोजकांकडून स्पर्धकांना चांगल्या प्रतीचा टी शर्ट, मेडल, तसेच नाष्टा व एनर्जी ड्रिंक, रुट सपोर्ट तसेच तात्काळ अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा पुरविली जाणार आहे. स्पर्धेमध्ये भरघोस रोख स्वरुपांची बक्षिसे तसेच सन्मानचिन्ह देखील दिली जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने केली जाणार आहे. रजिस्ट्रेशन दि. 15 मे 2021 ते 15 जुन 2022 पर्यंत केले जाणार आहे. 10 कि. मी. स्पर्धेसाठी 600 व 5 कि. मी. स्पर्धेसाठी 300 नाव नोंदणी केली जाणार आहे.
कोरोना काळात उत्तम स्वास्थ्य असणारे नागरिकच या जीवघेण्या रोगापासून स्वतःचे रक्षण करु शकले आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून बोल्ट द जिमच्या वतीने आपणा सर्वांचे आयुष्य निरोगी रहावे व सर्व रोगांचा उत्तमरीत्या प्रतिकार करावा यासाठी शरीराला धावणे, चालणे यासारख्या व्यायामाची सवय दैनंदिन लागावी या हेतुने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत-जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन बोल्ट द जिमचे व्यवस्थापक आयर्नमॅन मनोज चव्हाण व शेखर चव्हाण व उपस्थित कमिटीचे सदस्यांनी केले आहे.

COMMENTS