Homeताज्या बातम्या

सत्कारापेक्षा सत्कर्म करण्यातच समाधान मिळते : सुभाषराव गायकवाड

श्रीरामपूर : मानवी जीवन आणि संस्कृती सत्कार्यातून गतिशील होते, त्यामुळे सत्कारापेक्षा सत्कर्म हेच मला जीवनात समाधान देते, असे विचार आरोग्यमित्र स

कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी
दुग्ध व्यवसायातील नवतंत्रज्ञान महिलांनी आत्मसात करावे : डॉ. विखे
अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल

श्रीरामपूर : मानवी जीवन आणि संस्कृती सत्कार्यातून गतिशील होते, त्यामुळे सत्कारापेक्षा सत्कर्म हेच मला जीवनात समाधान देते, असे विचार आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांनी व्यक्त केले. येथील स्वाध्याय परिवाराचे सदस्य माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबूराव उपाध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा मित्र परिवाराचे सदस्य प्रा. शिवाजीराव बारगळ आणि निमगाव-खैरी मित्र परिवार यांनी आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांचा सत्कार केला, त्याप्रसंगी ते बोलत होते. आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांनी श्रीसंत सावता महाराज यांची पुण्यतिथी, श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा, स्व. सोमनाथ गायकवाड १४ वा स्मृतीदिन आणि वारकरी संप्रदाय दिंडी भक्त परिवार सेवा कार्यक्रमांच्या निमित्ताने उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अनेक मान्यवर पाहुणे व पुरुष महिला भक्तगण, भजनी मंडळ उपस्थित होते. सुभाषराव गायकवाड यांनी सर्व पारायण सोहळा भक्त परिवाराचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ. उपाध्ये यांनी सर्वांना पुस्तके भेट दिली. निमगाव-खैरी ग्रामस्थ आणि भगवत भक्त उपस्थित होते. दिंडी भक्तांना फराळ, चहा आणि उपस्थितांना महाप्रसाद देऊन उपक्रमांची सांगता झाली. आरोग्य, संत, समाज, संस्कृती आणि जीवन सेवेचा सत्कार : डॉ. बाबूराव उपाध्ये डॉ. उपाध्ये म्हणाले, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांचे जीवन सेवाभावी आहे. त्यांनी आरोग्यसेवा, संतसेवा, समाजसेवा, संस्कृतीपूजा यांचा आदर्श निर्माण केला आहे, सेवाभावी कडूभाऊ काळे यांच्या सेवेचा संस्कार लाभलेले सुभाषराव गायकवाड यांनी नागेबाबा पतसंस्था आणि इतर उपक्रमांत स्वतःला समर्पित केले आहे, त्यांच्या जीवन कार्याचा आणि त्यांच्या कार्याला हे नमन असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले.

COMMENTS