Homeताज्या बातम्याअहमदनगर

कोमल भूतांबरे यांची पोलीस खात्यात निवड 

संगमनेर : तालुक्यातील मेंगाळवाडी या आदिवासी ठाकरवाडीतील कोमल किसन भुतांबरे यांची नुकतीच पोलीस खात्यात निवड झाली. तालुका व मेंगाळवाडी गावासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. कोमल किसन भुतांबरे पुणे जिल्हा पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा व तिचे पती किसन सुभाष भुतांबरे यांचा सत्कार लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आ. डॉ.सुधीर तांबे, अजय फटांगरे, बाळकृष्ण गांडाळ, राजाराम भूतांबरे, सुभाष भुतांबरे, जनाबाई भूतांबरे,किसन भुतांबरे,सागर भुतांबरे मेंगाळवाडीतील नागरिक उपस्थित होते.  थोरात म्हणाले की, विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्याने कायमच प्रतिकूल परिस्थितीत मात करत आपला विकास साधला आहे. मेंगाळवाडी या आदिवासी ठाकरवाडीतील कोमल किसन भूतांबरे यांची पुणे जिल्हा पोलीस मध्ये झालेली निवड ही नक्कीच तालुका व मेंगाळवाडी गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. यातून इतर विद्यार्थ्यांनीही आदर्श घेत स्पर्धा परीक्षा व इतरही महत्त्वाच्या परीक्षा जिद्दीने द्याव्यात. अपयशाची भीती न बाळगता प्रामाणिक प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. कोमल भूतांबरेंच्या या निवडीबद्दल तालुक्यातील सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. बाळकृष्ण गांडाळ म्हणाले, कोमल भूतांबरे यांची पोलिस दलात निवड म्हणजे तमाम आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे. कोमलने मिळविलेल्या यशाबद्दल आदिवासी बांधवांच्या वतीने तिचे  अभिनंदन व तिच्या कडून सर्वसामान्य आदिवासी गोरगरिबांची सेवा व्हावी असेही ते म्हणाले.

खरिपाच्या यशस्वीततेसाठी सर्व विभागांचे प्रयत्न गरजेचे : आ.काळे; पूर्वनियोजन बैठकीत प्रशासनाला सूचना; खतटंचाई, हवामान बदलाचा आढावा
धर्मरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज : प्रकाशानंदगिरी महाराज; चांदा येथे विराट हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
अमृतवाहिनी बँकेचा1200 कोटींचा व्यवसायमाजी मंत्री थोरात ; ‘ बिजनेस समिट २०२६’ उत्साहात

संगमनेर : तालुक्यातील मेंगाळवाडी या आदिवासी ठाकरवाडीतील कोमल किसन भुतांबरे यांची नुकतीच पोलीस खात्यात निवड झाली. तालुका व मेंगाळवाडी गावासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

कोमल किसन भुतांबरे पुणे जिल्हा पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा व तिचे पती किसन सुभाष भुतांबरे यांचा सत्कार लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आ. डॉ.सुधीर तांबे, अजय फटांगरे, बाळकृष्ण गांडाळ, राजाराम भूतांबरे, सुभाष भुतांबरे, जनाबाई भूतांबरे,किसन भुतांबरे,सागर भुतांबरे मेंगाळवाडीतील नागरिक उपस्थित होते.

 थोरात म्हणाले की, विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्याने कायमच प्रतिकूल परिस्थितीत मात करत आपला विकास साधला आहे. मेंगाळवाडी या आदिवासी ठाकरवाडीतील कोमल किसन भूतांबरे यांची पुणे जिल्हा पोलीस मध्ये झालेली निवड ही नक्कीच तालुका व मेंगाळवाडी गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. यातून इतर विद्यार्थ्यांनीही आदर्श घेत स्पर्धा परीक्षा व इतरही महत्त्वाच्या परीक्षा जिद्दीने द्याव्यात. अपयशाची भीती न बाळगता प्रामाणिक प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. कोमल भूतांबरेंच्या या निवडीबद्दल तालुक्यातील सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. बाळकृष्ण गांडाळ म्हणाले, कोमल भूतांबरे यांची पोलिस दलात निवड म्हणजे तमाम आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे. कोमलने मिळविलेल्या यशाबद्दल आदिवासी बांधवांच्या वतीने तिचे  अभिनंदन व तिच्या कडून सर्वसामान्य आदिवासी गोरगरिबांची सेवा व्हावी असेही ते म्हणाले.

COMMENTS